जळगाव लाईव्ह न्यूज । 18 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिला हॉटेलवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातून समोर आलीय. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रामानंदनगर भागामध्ये 18 वर्षीय तरुणी ही वास्तव्याला आहे. 3 नोव्हेंबर 2023 रोजी तिची ओळख रवींद्र प्रभाकर मराठे (रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) याच्याशी झाली. त्याने पीडित तरुणीला लग्नाचे आश्वासन देऊन तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर जळगाव शहरातील आर. एल. चौफुली जवळील एका हॉटेलवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार 3 नोव्हेंबर 2023 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत झाला आहे. मात्र त्यावेळी ही तरुणी अल्पवयीन होती.
दरम्यान या संदर्भात पीडित तरुणीने एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार रवींद्र प्रभाकर मराठे आणि हॉटेल उपलब्ध करून देणाऱ्या राज सुरेश तायडे (रा. जळगाव) या दोघांविरुद्ध विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित हे पुढील तपास करीत आहेत.