निसर्ग संवर्धनासह पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आपणा सर्वांचीच
जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ जून २०२१ । वाढत्या शहरीकरणांतर्गत होणार्या झाडांच्या कत्तलीमुळे निर्माण झालेली पर्यावरणहानी, ‘कोरोना-19’च्या महामारीत सर्वत्र निर्माण झालेला ऑक्सिजनचा तुटवडा अन् पर्यावरण रक्षणाची नैतिक जबाबदारी किती महत्त्वाची आहे, याचे गांभीर्य आपणास आलेले आहे. त्या अनुषंगाने निसर्ग संवर्धनासह पर्यावरण रक्षणाचे कार्य करताना जळगाव शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून पावसाळ्यात शहरात विविध ठिकाणी वृक्ष लागवड केली जाईल, असे सांगत आज शनिवार, 5 जून 2021 अर्थात जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने शहरातील सागर पार्क, आकाशवाणी चौकानजीक महामार्गालगत तसेच जय दुर्गा माध्यमिक विद्यालय, मेहरुण इत्यादी प्रातिनिधिक ठिकाणी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांनी वृक्षारोपण केले.
सागर पार्कवर वृक्षारोपण
सागर पार्कवर झालेल्या सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या कार्यक्रमावेळी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील यांच्यासह प्रभाग क्र. 12 चे नगरसेवक श्री.नितीन बरडे, श्री.अनंत ऊर्फ बंटी जोशी, नगरसेविका सौ.उज्ज्वला बेंडाळे, सौ.गायत्री राणे, महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती श्री.राजेंद्र घुगे-पाटील यांनी वृक्षारोपण केले. शहर अभियंता अरविंद भोसले, पर्यावरण समितीचे श्री.सोनगिरे, अनिल करोसिया, श्री.लुले, संजय पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
नीर फाऊंडेशनचा उपक्रम
नीर फाऊंडेशनच्या माध्यमातून शहरातील आकाशवाणी चौकानजीक महामार्गालगतच्या जागेत महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते प्रातिनिधिक वृक्षारोपण करण्यात आले. या जागेत नीर फाऊंडेशनतर्फे दोनशे रोपांची लागवड केली जाणार आहे. याप्रसंगी नीर फाऊंडेशनचे संस्थापक श्री.सागर महाजन, अध्यक्ष श्री.भावेश रोहिमारे, सचिव श्री.नीलेश जोशी, श्री.देव महाजन, श्री.आशीष सोनार, श्री.सुयोग नेवे, श्री.सौरभ जैन, श्री.स्वप्नील चौधरी, श्री.दिनेश पाटील, श्री.विकास जाधव, श्री.उमेश सावकारे, श्री.कार्तिक खडके उपस्थित होते.
जय दुर्गा विद्यालयात वृक्षारोपण, सत्कार
मेहरुण परिसरातील जय दुर्गा माध्यमिक विद्यालयात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते प्रातिनिधिक वृक्षारोपण करण्यात आले. याचवेळी ‘कोरोना-19’च्या महामारीत नेरीनाका स्मशानभूमीत अहोरात्र मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्या श्री.धनराज सपकाळे, श्री.पंढरीनाथ बिर्हाडे, श्री.काशिनाथ बिर्हाडे, श्री.राजेंद्र कोल्हे, श्री.महेंद्र पाटील व कृष्णा पाटील, बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्या मू. जे. महाविद्यालयातील विद्यार्थी अनुक्रमे विकास वाघ, मुकेश पाटील, मुकेश सावकारे, कृष्णा साळवे, करण मालकर या कोरोनायोद्ध्यांचा रुमाल व पुष्पगुच्छ, त्याचप्रमाणे निसर्ग पर्यावरण सखी मंचाच्या उत्कृष्ट कार्य करणार्या वैशाली पाटील, अरुणा उदावंत, मीनाक्षी वाणी यांचा विद्यालयातर्फे महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते तुळस रोपे, कुंड्या देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निसर्ग पर्यावरण मंडळाचे शहराध्यक्ष श्री.पंकज नाणे, कार्याध्यक्षा मीनाक्षी पाटील, नाना पाटील, रघुनाथ सोनवणे, नेहा जगताप, छाया पाटील, सुचिता पाटील, मनीषा शिरसाठ, वंदना कोष्टी, ज्योती राणे, जयश्री पाटील, अलका बागूल उपस्थित होते.
श्रीराम शाळा परिसरात वृक्षलागवड
लक्ष्मीनगरातील श्रीराम शाळा परिसरात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख (जळगाव शहर-ग्रामीण, अमळनेर) श्री.विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख श्री.शरद तायडे, श्री.विलास भदाणे, श्री.जहीर पठाण, श्री.मानसिंग सोनवणे, नगरसेवक श्री.प्रशांत नाईक, सलमान खाटीक, महानगरपालिका कर्मचारी श्री.हेमंत ढंढोरे, रईस शेख आदी उपस्थित होते.