---Advertisement---
जळगाव जिल्हा नोकरी संधी

जळगाव जिल्हा बँकेतील भरतीबाबत मोठी अपडेट; लिपिकांच्या 220 जागा भरल्या जाणार

jdcc
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२५ । जळगाव जिल्हा बँकेत (Jalgaon District Bank) नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जिल्हा बँक लिपिकांच्या २२० जागा भरणार असून त्यासाठी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. भरती प्रक्रियेसाठी बँकेने राज्यातील एजन्सीकडून प्रस्ताव मागविले आहेत. चार महिन्यांत भरती करून लिपिकांना नियुक्तीपत्र देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार (Sanjay Pawar) यांनी दिली. JDCC Bank Jalgaon Bharti Update

jdcc

तत्कालीन चेअरमन अॅड. रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या कार्यकाळात बँकेने २२० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. आता पुन्हा चार वर्षांनी भरती केली जात आहे. दरम्यान, या भरतीत जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी होऊ लागली आहे.

---Advertisement---

सेवानिवृत्तीचा आकडा मोठा असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आजच्या घडीला ५०० सेवानिवृत्त कर्मचारी कराराने घेण्यात आलेले आहेत. अजून किमान पाचशे कर्मचाऱ्यांची गरज आहे. कार्यरत असलेल्यांना पदोन्नती दिली जाते, त्यांच्या जागी लिपिकांची भरती केली जाते. २२० जागा भरल्यानंतर अजून ३८० कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जातील. परीक्षा झाल्यानंतर लगेच निकाल व नियुक्तीपत्र देऊन उमेदवारांना हजर केले जाणार आहे. यासाठी चार महिन्यांचा कालावधी निश्चित केला आहे. किती एजन्सीचे प्रस्ताव येतात व कोणाला काम द्यायचे याचा निर्णय १७ फेब्रुवारीला घेतला जाणार आहे. दहा वर्षापूर्वी १६० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती, तेव्हा शासनाने सहा महिन्यांची मुदत दिली होती, मात्र या मुदतीत भरती प्रक्रिया राबविण्यात बैंक कमी पडली होती, तशी वेळ आता येऊ नये म्हणून एजन्सी नियुक्त करून त्यांना कालावधी ठरवून दिला जाणार आहे.

भरतीसाठी एजन्सी नियुक्त केली जाईल, त्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. जिल्ह्यातील उमेदवारांची मागणी असली तरी ऑनलाइन अर्ज प्राप्त होतील व एजन्सीमार्फतच परीक्षा आणि नियुक्ती दिली जाणार आहे. भरती पारदर्शक होणार असल्याने जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज करावेत असं जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन संजय पवार म्हणाले

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---