---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगावकरांनो! मालमत्ता करात ३१ जानेवारीपर्यंतच मिळणार सवलत, नंतर..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२५ । जर तुमचेही जळगाव महापालिका क्षेत्रात घर असेल आणि तुमच्याकडेही मालमत्ता कर थकीत असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच जळगाव महापालिकेतर्फे थकीत मालमत्ता करांवर लावण्यात आलेल्या शास्तीत १०० टक्के सूट घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत केवळ तीनच दिवस उरले आहेत. त्यानंतर १ फेब्रुवारीपासून १० टक्के शास्ती लागणार आहे.

थकीत मालमत्ता करांची १०० टक्के वसुली होण्यासाठी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी १ ते ३१ जानेवारी या कालावधीत थकीत मालमत्ता करांवर लावण्यात आलेली शास्ती १०० टक्के माफ केली होती. त्याचा अनेकांनी लाभ घेतला आहे. यातही ज्यांनी अजून या अभय शास्ती योजनेचा लाभ घेतलेला नाही त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत तीन दिवसांची मुदत शिल्लक आहे.

अभय शास्ती योजनेच्या पहिल्या टप्यात जानेवारीत १०० टक्के शास्ती माफ करण्यात आली होती. दुसऱ्या टप्यात ९० टक्के शास्ती माफ केली असून १० टक्के शास्तीची रक्क्म भरावी लागणार आहे. मार्च महिन्यापासून ७५ टक्के शास्ती भरावी लागणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त थकीत मालमत्ता धारकांनी लाभ घेत जप्तीसह नळसंयोजन बंद करण्याची अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, महसूल उपायुक्त धनश्री शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---