---Advertisement---
जळगाव जिल्हा हवामान

राज्यात पुन्हा पावसाचे सावट; पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यात?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२५ । महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत आहे, ज्यामुळे राज्यातील थंडी कमी झाली आहे आणि उकाडा वाढला आहे. या बदलांमध्ये देखील, हवामान खात्याने पुढच्या काही दिवसांत राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.

पावसाची शक्यता कोणत्या जिल्ह्यात?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 दिवसांपासून दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या 23 जिल्ह्यात माफकच थंडी जाणवली आहे. कोकण, खान्देश, नाशिक, नगर, संभाजीनगर अशा 13 जिल्ह्यात मात्र थंडीचा प्रभाव विशेष जाणवला नाही.

पुढील 10 ते 12 दिवस, म्हणजे 6 फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानात 2 ते 3 डिग्रीने वाढ होऊन थंडी अजून कमी होण्याची शक्यता आहे. परंतु एकापाठोपाठ मार्गस्थ होणाऱ्या पश्चिमी झंजावातामुळे अजूनही फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी कायमची गायब झाली असे नाही.

पावसाचे दिवस
सध्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, मात्र पुढील आठवड्यात, 1, 2 आणि 5 फेब्रुवारी या 2-3 दिवसामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहून अगदीच किरकोळ पावसाची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीला लातूर, नांदेड, बीड आणि सोलापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 2 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, बीड, जालना, अकोला, बुलडाणा, वर्धा, अमरावती, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर 5 फेब्रुवारीला लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात ही पावसाची शक्यता आहे.

वातावरणीय प्रणाली
सध्याच्या वातावरणीय प्रणाल्या बघता महाराष्ट्रात सध्या तरी गारपीटीची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस आणि गारपीट संबंधीची धास्ती बाळगू नये, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याची स्थिती जाणवत आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर अरबी समुद्रात पुन्हा दुसऱ्या असलेल्या लंब वर्तुळकार प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे विदर्भ, मराठवाड्यासहित संपूर्ण उत्तर अर्ध महाराष्ट्रात आर्द्रता लोटली जात असल्यामुळे दमट वातावरण जाणवत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---