---Advertisement---
नोकरी संधी

ग्रॅज्युएट्स पाससाठी लेखा व कोषागारमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार 92,000 पर्यंत मिळेल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही पदवी पास असाल आणि सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नाशिक विभाग लेखा आणि कोषागार संचालनालयात भरती (Mahakosh Lekha & Koshagar Vibhag Bharti) निघाली आहे. कनिष्ठ लेखापाल (गट क) या पदासाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. विशेष नोकरीचे ठिकाण जळगाव मध्ये देखील आहे. Nashik Mahakosh Bharti 

या भरतीद्वारे 59 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेला सुरुवात झालीय. इच्छुकांनी संबंधित वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करावीत.

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 23 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, & नंदुरबार

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
पगार : या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २९,२०० ते ९२,३०० रुपये पगार मिळेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2025
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---