---Advertisement---
बातम्या राष्ट्रीय वाणिज्य

अत्याधुनिक फीचर्सनी सज्ज नवीन Honda Activa भारतात लाँच; किंमत जाणून घ्या..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२५ । तुम्हीही होंडाची नवीन स्कुटर (Honda Activa) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. होंडा मोटरसायकल (Honda Motorcycle) आणि स्कूटर इंडिया (HMSI) ने भारतातील सर्वाधिक लोकप्रिय स्कूटर अ‍ॅक्टिवाचा नवीन OBD2B-अनुरूप मॉडेल लाँच केली आहे. अत्याधुनिक फीचर्सनी सज्ज ही नवीन अ‍ॅक्टिव्हा ग्राहकांच्या बदलत्या गरजांना ध्यानात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे.

किती आहे किंमत?
नवीन 2025 होंडा अ‍ॅक्टिव्हाची किंमत 80,950 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही नवीन स्कूटर आता संपूर्ण भारतातील HMSI डीलरशिप्सवर उपलब्ध आहे.

नवीन अ‍ॅक्टिव्हा: नवीन रंग आणि प्रगत फीचर्स
या नवीन अ‍ॅक्टिव्हामध्ये 109.51cc, सिंगल-सिलिंडर PGM-Fi इंजिन आहे, जे आता OBD2B-अनुरूप आहे. हे 8,000 RPM वर 5.88 kW ची पावर आणि 5,500 RPM वर 9.05 Nm टॉर्क देते. याशिवाय, इंधन कार्यक्षमतेसाठी आयडलींग स्टॉप सिस्टमसह सुसज्ज आहे.

फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, अ‍ॅक्टिवामध्ये 4.2 इंच TFT डिस्प्ले आहे, ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. हे होंडा रोडसिंक अ‍ॅपशी सुसंगत आहे, जे नेव्हिगेशन आणि कॉल/मॅसेज अलर्ट यांसारख्या फंक्शन्स सक्षम करते, ज्यामुळे राइडर्स प्रवासादरम्यान कनेक्ट राहू शकतात. अ‍ॅक्टिव्हामध्ये आता USB टाइप-C चार्जिंग पोर्ट देखील आहे, ज्यामुळे राइडर्स त्यांच्या डिव्हाइसला सहज चार्ज करू शकतात.

ही स्कूटर तीन व्हेरियंट्समध्ये सादर केली गेली आहे – STD, DLX, आणि H-Smart. ही स्कूटर सहा रंग पर्यायांसह उपलब्ध आहे: पर्ल प्रेशियस व्हाईट, डीसेंट ब्लू मेटालिक, पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट अ‍ॅक्सिस ग्रे मेटालिक, रिबेल रेड मेटालिक, आणि पर्ल सायरन ब्लू.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---