गुन्हेजळगाव जिल्हा

गिरणा पाटचारीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२५ । एरंडोल तालुक्यातून एक धक्कादायक घटना घडली. ज्यात एका रवंजा येथील तरुणाने गिरणा पाटचारीत उडी घेऊन आत्महत्या केली. सुनील हिरालाल जगताप (वय ३३, रा. रवंजा ता. एरंडोल) असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान सुनील जगताप यांच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे.

सुनील जगताप हा रवंजा गावात परिवारासह राहत होता. दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशनला अनिल हिरालाल मराठे (रा. रवंजा) यांनी खबर दिली आहे.त्यानुसार सोमवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी एका कंपनीत अनिल मराठे हे कामाला गेले होते. तेव्हा त्यांना त्यांच्या मित्राने, तुझा लहान भाऊ सुनील जगताप यांनी गिरणा कॅनॉल तथा पाटचारी मध्ये उडी घेतली आहे. तू घरी ये, असा फोन केला.

सकाळी ७ वाजता एरंडोल तालुक्यातील खर्ची शेत शिवारातील अनिल नारायण महाजन यांच्या शेताजवळील गिरणा कॅनॉलमध्ये सुनील जगताप हा आढळून आला. दरम्यान सुनील जगताप यांच्याकडे सुसाईड नोट सापडली आहे.

काय आहे सुसाईड नोटमध्ये?
त्याच्यामध्ये म्हटले आहे की, मी सुनील आजपासून सर्व त्याग करीत आहे. आज माझा शेवटचा दिवस आहे. आम्ही दोघेजण व्यवस्थित जीवन जगत होतो. पण आमच्या दोघांमध्ये एका व्यक्तीने माझ्या बायकोवर नजर ठेवत होता आणि तिला धमकी देत होता. तू जर माझ्या सांगण्याप्रमाणे केले नाही तर मी तुला बदनाम करेल. हे तिने मला सर्व काही सांगितले व मी ते ऐकून स्तब्ध झालो. माझे होश उडाले. आता मी काहीच करू शकत नाही. त्यामुळे मी माझी जीवनयात्रा संपवतो असे सुसाईड नोट मध्ये म्हटले आहे. घटनेमुळे रवंजा गावामध्ये शोककळा पसरली असून एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पुढील तपास पो.नि. निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेश पाटील करीत

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button