सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जम्बो भरती; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना नोकरीची संधी, पगार 85920
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बँकेत सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये (Central Bank of India) २६६ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष पदवी पास असलेला उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड स्केल-१ पदासाठी ही भरती होत आहे. तुम्हीही या भरती इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. लक्ष्यात असू द्या ९ फेब्रुवारी २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. Central Bank of India Bharti 2025
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी. मेडिकल, इंजिनियरिंग आणि सीए पदवी प्राप्त उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अर्जदाराचे वय २१ ते ३२ वर्षांमध्ये असावे.
अर्ज शुल्क :
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क जमा करायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना आणि महिलांना १७५ रुपये शुल्क भरायचे आहे.
पगार : 48480-2000/7-62480-2340/2-67160-2680/7-85920/-
अर्ज कसा करावा?
सर्वप्रथम तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर जाऊन क्लिक करावे लागेल.
Click here for New Registration यावर क्लिक करायचं आहे.
यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यावर सर्व माहिती भरावी.
यानंतर सही आणि फोटोग्राफ अपलोड करायचे आहे.
यानंतर शुल्क भरायचे आहे.यानंतर फॉर्म सबमिट करायचा आहे.
फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.