जळगावचे तापमान पुन्हा घसरले ; आजपासून पुढचे 5 दिवस असं राहणार वातावरण?
जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२५ । जळगावसह महाराष्ट्रातील हवामानात (Weather News) पुन्हा एकदा बदल होत आहेत, ज्यामुळे जळगावसह महाराष्ट्रात थंडी वाढत आहे. मागील दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यात (Jalgaon District) थंडीचा जोर वाढू लागला आहे. गेल्या आठवड्यात १८ अंशावर गेलेला जळगावचा पारा १३ अंशापर्यंत घसरला आहे. २३ जानेवारीनंतर जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आहे. सध्या रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका जाणवत असून मात्र दुपारच्या वेळेस उकाडा जाणवत आहेत. Jalgaon Weather Update
नवीन वर्षाची सुरुवात झाल्यापासून हवामान हे संमिश्र राहिले आहे. काही दिवस कडाक्याची थंडी तर काही दिवस ढगाळ वातावरण व त्यामुळे गायब झालेली थंडी असे वातावरण जानेवारी महिन्यात आतापर्यंत पाहायला मिळाले होते. आता आगामी दोन ढगाळ वातावरण कायम राहू शकते. मात्र, २३ जानेवारीनंतर जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीचा अंदाज आहे.
गेल्या आठवड्यात जळगावचे वातावरण १८ अंशापर्यंत वाढले होते. मात्र शुक्रवारपासून त्यात घसरण होताना दिसून आले. रविवारी जळगावचे किमान तापमान १३ अंशापर्यंत तर कमाल तापमान ३०.४ अंश इतके होते. दरम्यान आज जळगावचे किमान तापमान १२ अंशापर्यत राहण्याची शक्यता असून यादरम्यान वाऱ्याचा वेग तशी १५ ते २० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी अखेरपर्यंत राहू शकतो थंडीचा जोर..
यंदा जिल्ह्यात थंडीचे आगमन जरा उशिरानेच झाले होते. त्यातही नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यातही अनेक दिवस ढगाळ वातावरण राहिल्याने यंदा तसा थंडीचा कडाका जाणवलेलाच नाही.फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा अवकाळीची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. तर फेब्रुवारी अखेरपर्यंत मात्र थंडीचा जोर राहण्याचा अंदाज आहे.
आगामी पाच दिवस कसे राहणार वातावरण
२० जानेवारी : तापमान १२ अंश, कोरडे वातावरण राहणार
२१ जानेवारी : तापमान १४ अंश, काही अंशी ढगाळ वातावरण राहणार
२२ जानेवारी : तापमान १४ अंश, सकाळच्या वेळेस धुकं, दुपारनंतर काही अंशी ढगाळ वातावरण राहणार
२३ जानेवारी : तापमान १६ अंश, दुपारनंतर काही अंशी ढगाळ वातावरण राहणार
२४ जानेवारी : तापमान १३ अंश, कोरडे वातावरण राहणार