Jalgaon Murder : जळगाव शहरात भरदिवसा तरुणाचा खून; 5 जण जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी डोकं वर वाढत असल्याचं दिसत असून अशातच जळगाव शहरात जुन्यावादातून घरातील कुटुंबावार चॉपर आणि कोयता, प्राणघातक हल्ला झाला. यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज विवारी १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली असून यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मुकेश रमेश शिरसाठ वय- २६ रा. पिंप्राळा हुडको, जळगाव असे महेश झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर जखमी झालेल्या ५ जणांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत असे की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात राहणाऱ्या मुकेश रमेश शिरसाठ या तरूणाचा काही महिन्यांपूर्वी परिसरातील तरुणांशी वाद झाला होता. जुन्या वादातून शनिवारी रात्री दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली होती. रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शिरसाठ कुटुंबावर सात ते आठ जणांनी चॉपर, कोयता, चाकू आणि लाकडी काठी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये निळकंठ सुखदेव शिरसाट वय-४५, कोमल निळकंठ शिरसाठ, करण निळकंठ शिरसाठ वय-२५, ललिता निळकंठ शिरसाठ वय-३० आणि सनी निळकंठ शिरसाठ वय २१, सर्व रा.पिंप्राळा हुडको, जळगाव हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
घटनेत मुकेश रमेश शिरसाठ वय-२६ या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. वैद्यकीय महाविद्यालयात मित्र परिवारासह नातेवाईकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. ही घटना घडल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली तसेच जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.