जळगाव जिल्हाहवामान
जळगावचे किमान तापमान स्थिर ; आज कसं असेल हवामान?
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२५ । जळगावसह राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून थंडीची तीव्रता कमी झाली. थंडगार वातावरणाची जागा उबदार तापमानाने घेतली. गेल्या आठवड्यात १० अंशाखाली खाली असलेलं जळगावचे तापमान सध्या १६ अंशावर गेलं आहे. बदललेल्या हवामानामुळे नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
आज जळगावचे कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सायंकाळी आकाश किंचित ढगाळलेले राहण्याची शक्यता आहे.
सध्या मागील गेल्या दोन तीन दिवसापासून किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली. पहाटे आणि रात्रीच्या सुमारास थंडी काहीशी जाणवते मात्र दुपारच्या सुमारास उष्णता जाणवत आहे. मात्र काल रात्री उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे थंडीचा कडाका जाणवू लागला होता.