जळगाव जिल्हा
वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जळगावात पोलीस दलातर्फे हेल्मेट जनजागृती रॅली
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२५ । जळगाव शहरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून यात अनेकांना जीवावर मुकावे लागले आहे. शहरात वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दल आणि शहर वाहतूक शाखेतर्फे आज (दि. १७) सकाळी जळगाव शहरात हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली शहरातील नवीन बस स्थानक चौक नेहरू चौक टॉवर चौक, अशा शहरातील विविध मार्गाने निघाली.
त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आवारात या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीला जळगावकर नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या रॅलीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, आमदार राजूमामा भोळे यांच्यासह पोलीस विभागातील कर्मचारी व नागरिक यांचा या रॅलीमध्ये सहभागी होते.