⁠ 
बुधवार, मे 8, 2024

आयशरच्या धडकेत धरणगावचा दुचाकीस्वार ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२३ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण काही केल्या कमी होत नसून अशातच भरधाव आयशरच्या दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धरणगाव शहरानजीक घडली. मोरेश्वर लोटू अत्तरदे (वय-५० रा.साळवा ता. धरणगाव) असं अपघातातील मृताचे नाव असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत असे की धरणगाव तालुक्यातील साळवा येथील मोरेश्वर लोटू अत्तरदे आपल्या वडिलांसह वास्तव्याला असून ते गेल्या चार ते पाच दिवसांपासून ते नातेवाईकांकडे मुंबई येथे गेले होते. गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ते मुंबई येथून धरणगाव येथे आले होते. दरम्यान धरणगाव येथून त्यांनी त्यांच्या दुचाकीने गावी साळवा येथे जाण्यासाठी सकाळी ६.३० वाजता निघाले.

दरम्यान धरणगावच्या पुढे असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ चोपडाकडून धरणगावकडे येणाऱ्या अज्ञात आयशर वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर साळवा गावातील नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे