गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
डॉ. केतकीताईंच्या पुढाकारातून भावी पिढीला मिळाले स्टार्टअप व्यासपीठ
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२५ । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नॅशनल स्टार्टअप डे निमित्ताने स्वावलंबी भारत अभियाना अंतर्गत विद्यमान खासदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत उद्यमिता संमेलन उत्साहात संपन्न झाले. डॉ केतकीताईंच्या पुढाकारातून या कार्यक्रमाच्या निमीत्ताने भावी पिढीला दिशा व नवीन व्यासपिठ मिळाले असल्याची चर्चा होती.
२०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारी २०१६ रोजी सरकारने सुरू केलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाची घोषणा केली, हा दिवस गेल्या दशकभरात भारतीय स्टार्टअप्सच्या वाढीला अधोरेखित करतो.त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्टार्टअप डे च्या निमित्ताने स्वावलंबी भारत अभियान व गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१६ रोजी सकाळी १० ते १ दरम्यान उद्यमिता संमेलना चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच खा. श्रीमती स्मिताताई वाघ यांच्यासह वक्ते संचालक, त्रिनेत्रीनी क्वाँटम प्रा.लि. योगेश उदगिरे संचालक, त्रिनेत्रीनी क्वाँटम प्रा.लि.चे प्रा.डॉ.विकास गिते, प्रशांत पाटील व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र जळगाव, डॉ. युवराज परदेशी तसेच प्रमुख अतिथी प्रा. डॉ.विजय पाटील (प्राचार्य, गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग) प्रा.डॉ.प्रशांत वारके (संचालक,गोदावरी आयएमआर, जळगाव) यांची उपस्थिती होती.मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नॅशनल स्टार्टअप डे तसेच स्वावलंबी भारत अभियान या अंतर्गत होणार्या उपक्रमा बद्दल सर्वांना माहिती दिली प्रमुख वक्ते श्री योगेश उदगीरे यांनी ऍडव्हान्स मध्ये सांगताना प्रॉम्प्ट इंजीनियरिंग, ए आय टूल, चाट जीपीटी बद्दल संपूर्ण माहिती देत भारत सरकार वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून स्टार्टअप साठी लाखांची ग्रँड देत असते. त्यामुळे स्वतःच स्वतःची जबाबदारी घेऊन स्टार्टअप साठी प्रेरित होणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी इकोसिस्टीम बद्दल सांगताना वेगवेगळ्या कंपन्या,त्यांची मार्केटिंग, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी बद्दलही माहिती दिली. डॉ. विकास गीते यांनी स्टार्टअप डे संदर्भात माहिती देताना आता स्टार्टअप सुरू करणे सोपे झाले आहेत व त्या संदर्भात लागणारे साहित्य, बॅकग्राऊंड पैसा व इतर असेट्स याबद्दलची संपूर्ण माहिती दिली.
विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्टार्टअप चे नवीन फीचर्स वर विचार करा कमी पैशातही स्टार्टअप सुरू होऊ शकते. वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. डॉ. केतकी ताई पाटील यांनी स्टार्टअप संदर्भात माहिती सांगताना सांगितले की स्टार्टअप म्हणजेच सुरुवात करणे आणि ही तर फक्त सुरुवात आहे. संपूर्ण जगात आपण स्टार्टअप मध्ये तीन नंबर वर आहोत हेही त्यांनी नमूद केले. आपल्या भागात स्पर्धा कमी आहे म्हणजेच आपल्याला जास्त स्कोप आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना स्पष्ट केले. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे आहे त्याचप्रमाणे विविध भाषांवर आपले प्रभुत्व असणे गरजेचे आहे तसेच प्राचीन इंटेलिजन्स कडेही विद्यार्थ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणूनच आज हे व्यासपिठ उभे करून दिल्याचे मनोगत व्यक्त केले.
खा. स्मिताताई वाघ यांनी राजकारणाआधी त्या स्वतः एक उद्योजक होत्या त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमाबद्दल त्यांना विशेष आदर आहे. त्यांच्या उद्योजकता ते राजकीय प्रवास त्यांनी रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना कथन केला. नोकर्या करण्यापेक्षा नोकर्या देणारे व्हा. हे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच अशा प्रकारचे उपक्रम ही महाविद्यालयांमध्ये नियमित राबवले जावे याबद्दलही त्यांनी सूचक विधान केले. या संमेलनात तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी त्यांच्या अनुभवांच्या आधारे व्यवसाय आरंभ करण्याच्या महत्त्वपूर्ण गोष्टींवर मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे जळगाव जिल्ह्यातील तरुणांना उद्योजकतेच्या नवीन वाटा शोधण्यासाठी प्रेरणा मिळाली.जळगावच्या तरुणाईने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संमेलनाचा लाभ घेतला.सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील (सचिव) यांनी कौतुक केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील(आयआय सी प्रेसिडेंट) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हेमंत इंगळे(अधिष्ठाता) प्रा.महेश पाटील(डीन रिसर्च अँड इनोवेशन) तसेच डॉ.अतुल बर्हाटे(आयआयसी कन्व्हेनर) यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नीलाक्षी बर्डे व हेमांगी बावा या विद्यार्थिनींनी केले.