गुन्हेजळगाव जिल्हा

Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू माफियांची दबंगगिरी वाढली असून त्यांच्याकडून महसूल पथकावर होणारे हल्ले देखील वाढताना दिसत आहे. अशातच पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथे अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्याने वाळू माफियांनी वाद घालत महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. पथकातील तलाठ्याला एकाने ट्रॅक्टरवरून खाली ओढले. याबाबत चार जणांना अटक करण्यात आली आहे.

राज भाऊसाहेब पाटील, दुर्गेश ऊर्फ नानू भाऊसाहेब पाटील, विवेक ऊर्फ भावड्या वसंत पाटील, हिरालाल निंबा पाटील (सर्व रा. अंतुर्ली, खुर्द, ता. पाचोरा) अशी अटक करण्यात आलेल्या वाळू माफियांची नावे आहेत. अंतुर्ली खुर्द येथे अवैधरीत्या वाळूचा साठा करण्यात आल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली होती. यानंतर महसूल विभागातील चार जणांचे पथक या गावात पोहचले. त्यात निपाणे तलाठी तात्याराव माणिकराव सपकाळ, बाळद बुद्रुकचे तलाठी अतुल बापूराव पाटील, पुनगावचे तलाठी तेजस रोहिदास बहऱ्हाटे आणि पाचोरा तलाठी गंगाधर अण्णाराव सुरनर यांचा समावेश होता.

पथक तिथे पोहचले त्यावेळी एक ट्रॅक्टर गिरणा नदी पात्रातून येताना दिसले. पथकाने हे वाहन थांबवले असता, वाळू माफियांनी पथकाला मारहाण केली. तलाठी अतुल पाटील ट्रॅक्टरवर चढले असता त्यांना खाली ओढत वाळू माफियांनी ट्रॅक्टर पळवून नेले. त्याठिकाणी ६४ हजार रुपयांची अवैध वाळू जप्त करण्यात आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button