जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२५ । विकास आयुक्त उद्योग आणि महाराष्ट्र उद्योग व्यापार आणि गुंतवणूक सुविधा सेलचे अध्यक्ष राज्याचे निर्यात आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांच्यावतीने आयोजित महाराष्ट्र निर्यात संमेलनाचे उद्घाटन खासदार स्मिता वाघ तसेच आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे संपन्न झाले.
यावेळी नाशिक विभागाच्या उद्योग सहसंचालिका श्रीमती वृषाली सोने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील, व्यवस्थापक श्री डोंगरे, श्री पाटील, जिल्हा उद्योग केंद्र व खादी आणि ग्रामोद्योग मंडळ यांचे अधिकारी कर्मचारी तसेच उद्योग क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होते. या संमेलनात जळगाव जिल्ह्यातील लघु आणि मध्यम उद्योग यांना निर्यातीसंबंधी केंद्र तसेच राज्य शासनाच्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली तसेच निर्यात तज्ञांच्या मदतीने त्यांना मार्गदर्शन व सहकार्य प्रदान करण्यात आले.
या संमेलनासाठी निर्यात व उद्योग क्षेत्रातील उपनिदेशक.हिमांशू पांडे,उपनिदेशक, अंकित दिवेकर, महेश चौधरी, प्रणिता चौरे, सिद्धेश्वर मुंडे, जयेश राणे, तुषार परदेशी या तज्ञ सदस्यांनी आपापल्या विषयाचे मार्गदर्शन उपस्थित उद्योजकांना दिले. या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक संघटना पदाधिकारी तसेच उद्योजक उपस्थित होते. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले.