⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | गुन्हे | जळगाव महामार्गावरील अपघाताची मालिका थांबेना! ट्रॅक्टरच्या धडकेत विद्यापीठातील मेस चालक ठार

जळगाव महामार्गावरील अपघाताची मालिका थांबेना! ट्रॅक्टरच्या धडकेत विद्यापीठातील मेस चालक ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२५ । जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. अशातच आणखी एकाच अपघातात जीव गेला आहे. महामार्गावरील खोटेनगर जवळ भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत विद्यापीठातील मेस चालकाचा मृत्यू झाला आहे. पंकज शालीग्राम शर्मा असं अपघातातील मृताचे नाव आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक तेथून पसार झाला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मेस चालक पंकज शालिग्राम शर्मा (वय ६०, रा. प्रेमनगर) हे बुधवारी विद्यापीठातील मेसचे काम आटोपून त्यांच्या बुलेटने घराकडे निघाले होते. याच दरम्यान, खोटेनगर ते मानराज पार्क दरम्यान उड्डाणपुलावर ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक एवढी जबर होती की, शर्मा यांच्या डोक्यासह हाताला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर बुलेटच्या पुढील भागाचा चुराडा झाला. दरम्यान, अमळनेर येथील बैठक आटोपून जिल्हा परिषदेचे सीईओ श्री. अंकित हे जळगावात येत होते, उड्डाणपुलावर त्यांना अपघात दिसताच, ते मदतीसाठी धावून आले.

अपघातानंतर ट्रॅक्टर पसार
अपघातानंतर ट्रॅक्टर चालक तेथून पसार झाला. शर्मा यांच्या ओळखीचे काही तरुण खोटेनगरकडून येत होते. अपघातस्थळी तरुण मंडळी थांबल्यावर त्यांना शर्मा यांचा अपघात झाल्याचे दिसून आल्यावर त्यांची ओळख पटली. त्यानंतर रुग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांनी शर्मा यांना तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. यावेळी रुग्णालयात नातेवाइकांसह मित्र मंडळींची गर्दी झाली होती.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.