⁠ 
मंगळवार, जानेवारी 7, 2025
Home | जळगाव जिल्हा | महाराष्ट्रात पुन्हा तापमान बदलणार; जळगावातील तापमानाची स्थिती काय?..

महाराष्ट्रात पुन्हा तापमान बदलणार; जळगावातील तापमानाची स्थिती काय?..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२५ । जळगावसह (Jalgaon Weather) राज्यात गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी झाली होती. या आठवड्यात रात्रीचा तापमानात पुन्हा घसरण झालीय. जानेवारीच्या (January) पहिल्या आठवड्यात थंडी परतण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती, मात्र अद्यापही थंडीची तीव्रता राज्यात जाणवत नाही. राज्यात थंडी कधी परतणार? याकडे सर्वांनी डोळे लावलेत. Maharashtra Weather

सध्या उत्तर भारतातही थंडीचा प्रभाव कमी झाल्याने याचा प्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रावर (Maharashtra) दिसून येतोय. राज्यात कमाल आणि किमान तापमानामध्ये सतत बदल होत आहेत, मात्र पुढील काही दिवसांत हवामानात बदल होईल आणि थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान आगामी काही दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने महाराष्ट्रात कोरड्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. (Weather Update Maharashtra)

दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांत राज्यात तापमान वाढू शकते, ज्यामुळे दुपारच्या वेळी थोडा उकाडा जाणवेल. सकाळी मात्र तापमान कमी राहील, त्यामुळे थंडी पुन्हा एकदा जाणवण्याची शक्यता आहे. काही भागात नागरिकांना वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा त्रास होऊ शकतो.

कसं असेल तापमान ?
आयएमडी (IMD)च्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 2 ते 4 अंश सेल्सियसने तापमान वाढू शकते. मात्र, विदर्भात 4 ते 5 अंशांनी तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातही तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यापासून राज्यात पुन्हा थंडी जाणवेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

जळगावच्या किमान तापमानात घट:
जळगाव सोमवारी (३० डिसेंबर) किमान तापमान १७ अंशापर्यंत तर कमाल तापमान २७.४ अंश इतके होते. त्यात गेल्या तीन दिवसात रात्रीच्या तापमानात ४ अंशापर्यंत ची घसरण झालेली दिसून येत आहे. बुधवारी जळगावचे किमान तापमान १३ अंश तर कमाल तापमान २८.२ इतके होते. पुढील काही दिवसात तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे. सध्या रात्री आणि पहाटे थंडी जाणवत आहे. मात्र दुपारी उन्हाचा काहीसा चटका लागत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.