गुळाचा भाव वाढला! आता एक किलोसाठी मोजावे लागतंय ‘इतके’ रुपये?
जळगाव लाईव्ह न्यूज । हिवाळ्यात गुळाचा आहारात समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे गुळासोबत तिळाचेही सेवन केले तर सर्दी, खोकला आणि पलूसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. सध्या वातावरणात बदल झाल्याने आरोग्याच्या समस्या वाढत आहे. गुळाच्या विक्रीतही वाढ झाली असून, गेल्या महिन्यात ५५ रुपये किलो असलेल्या गुळाचे भाव दहा रुपयांनी वाढून ६५ रुपये किलो झाले आहेत.
हिवाळ्यात वारंवार ताप येत असेल तर सुंठ आणि गुळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या मुळे ताप येण्याची समस्या दूर होते. तोंडातून दुर्गंधी येत असेल तर गुळ आणि बडीशेप एकत्र करून खावे. हिवाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी गुळाचे लाडू खातात.
कोल्हापुरी गुळाला मागणी गुळाचा चहा पिणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने कोल्हापुरी गुळाला मागणी वाढली आहे. बाजारात गेल्या महिन्यात ५५ रुपये किलो मिळणारा गूळ आता ६५ रुपये झाला आहे. ५ किलोची भेली २७५ रुपयांना तर १० किलो ५२० रुपयांना विक्री केले जात असल्याचे व्यावसायिक यांनी सांगितले.