जळगाव लाईव्ह न्यूज । ३ डिसेंबर २०२४ । लग्नसराईच्या या हंगामात सध्या सोने आणि चांदीच्या भावात चढउताराचे सत्र दिसून येत आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्यात घसरण दिसून आली.
सोन्यात आली स्वस्ताई
गेल्या आठवड्यात सोने एक हजार रुपयांनी वधारले. तर जवळपास 500 रुपयांनी उतरले होते. या आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवारी सोन्याच्या किंमतीत 650 रुपयांची घसरण झाली. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव उतरला. 2 डिसेंबर रोजी सोने अनुक्रमे 600 आणि 650 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,005 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा भाव
गेल्या 15 दिवसांत चांदीने मोठी उसळी घेतली. पण तितकीच किंमतीत घसरण झाली. गेल्या आठवड्यात चांदीत 2500 रुपयांची घसरण झाली. तर आठवड्याच्या अखेरीस त्यात 2 हजारांची महागाई आली. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी 500 रुपयांनी किंमती स्वस्त झाल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये इतका आहे.