सीमा सुरक्षा दलाने (BSF) कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी नोकरीची अधिसूचना जारी केली आहे. ही भरती क्रीडा कोट्यांतर्गत होत असून त्याअंतर्गत एकूण 275 कॉन्स्टेबलची भरती केली जाणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 1 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
पदांचा तपशील :
कॉन्स्टेबल जनरल ड्युटी (पुरुष): १२७ पदे
कॉन्स्टेबल जनरल ड्युटी (महिला): 148 पदे
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण केलेली असावी. ही भरती क्रीडा कोट्याअंतर्गत केली जात आहे, त्यामुळे उमेदवाराने विविध स्तरांवर क्रीडा क्षेत्रात सहभाग घेतलेला असावा आणि तो क्रीडा कोट्यासाठी पात्र असावा.
वय मर्यादा
उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 23 वर्षे असावे. 1 जानेवारी 2025 च्या आधारे वयाची गणना केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल, जी नियमानुसार असेल.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही, ही उमेदवारांसाठी दिलासादायक बाब आहे.
एवढा पगार मिळेल
निवडलेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी स्तर 3 नुसार 21,700 रुपये ते 69,100 रुपये पगार दिला जाईल. याशिवाय इतर सरकारी भत्तेही दिले जाणार आहेत.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा