⁠ 
मंगळवार, जानेवारी 14, 2025
Home | बातम्या | 1 डिसेंबरपासून OTP बाबत लागू होणार ‘हा’ नवीन नियम

1 डिसेंबरपासून OTP बाबत लागू होणार ‘हा’ नवीन नियम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२४ । आजच्या काळात ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये लोकांच्या स्मार्टफोनमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट ओटीपीचा वापर केला जात असल्यामुळे अनेकवेळा लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने अलीकडेच लोकांना फसवणूक आणि ऑनलाइन फसवणूकीपासून वाचवण्यासाठी अनेक उपाय लागू केले आहेत.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने गेल्या काही महिन्यांत फसव्या कॉल्स आणि मेसेजला सामोरे जाण्यासाठी तसेच ग्राहकांचे अधिक चांगले संरक्षण करण्यासाठी अनेक निर्देश जारी केले आहेत. ट्रायने रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि सरकारी मालकीच्या बीएसएनएलसह सर्व दूरसंचार कंपन्यांना 1 डिसेंबरपासून ट्रेसेबिलिटी नियम लागू करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे फिशिंग आणि स्पॅमची प्रकरणे थांबवता येतील. नवीन नियमांमुळे, ग्राहकांना ओटीपी येण्यास थोडा विलंब होऊ शकतो. ट्रायचे हे पाऊल ग्राहकांना बनावट कॉल आणि संदेशांपासून वाचवण्यासाठी एक मोठा प्रयत्न आहे.

हा नियम कसा काम करेल
फिशिंग आणि स्पॅम सारख्या फसवणुकीचा मागोवा घेतला जाईल आणि संदेश ट्रेसिबिलिटीद्वारे थांबवला जाईल. ट्रायचा हा नियम डिजिटल फसवणूक कमी करण्यासाठी आणि सुरक्षित मेसेजिंग सिस्टम तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो.

नवीन नियमांनुसार, आता मेसेज पाठवणाऱ्यापासून प्राप्तकर्त्यापर्यंत पूर्णपणे शोधण्यायोग्य म्हणजेच ट्रेसिबल असावा. ऑगस्टमध्ये सर्वप्रथम या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. या ट्रेसिबिलिटी प्रक्रियांची अंमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांना 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली हाेती. मात्र, जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल सारख्या मोठ्या कंपन्यांच्या विनंतीवरून ही मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली.

आता 30 नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीनंतर कंपन्यांना संदेश ट्रेसिबिलिटी निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. ट्रायने टप्प्याटप्प्याने या नियमांची अंमलबजावणी करण्यास परवानगी दिली होती आणि कंपन्यांना 30 नोव्हेंबरपर्यंत या सूचनांचे पालन हाेत असल्याची खात्री करण्यास सांगितले होते. 1 डिसेंबरपासून मार्गदर्शनाचे पालन न करणाऱ्या व्यवसायांचे संदेश ब्लॉक केले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, ट्रेसिबिलिटी प्रक्रियेच्या अंमलबजावणीमुळे 1 डिसेंबरपासून ओटीपी प्राप्त करण्यास थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. यामुळे ऑनलाइन बँकिंग, बुकिंग आणि इतर सेवांसाठी वापरकर्त्यांना ओटीपी मिळण्यास अधिक वेळ लागू शकतो.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.