निवडणूक झाली; आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबरचे पैसे कधी येणार?

नोव्हेंबर 24, 2024 1:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२४ । यंदाच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व विजय मिळाला. तब्बल २३५ जागांवर महायुतीचे उमेदवारांनी विजय मिळवला असून महायुतीच्या त्सुनामीत मविआ चारीमुंड्या चीत झाली आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ महायुतीला मिळाल्याचं बोललं जात असले तरी आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजना तात्पुरती बंद होती. आता महायुतीचे सरकार पुन्हा येणार असल्याचं निश्चित झालं असून आता लाडक्या बहिणींना आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार याची प्रतीक्षा आहे.

ladki bahin yojna

एकनाथ शिंदे यांनी आचारसंहितेदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार आहेत. ज्या ज्या महिलांचे पैसे खात्यावर आले नाहीत, त्यांचे पैसे हे डिसेंबर महिन्यात जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेंतर्गत दर महिन्याला महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा केले जातात.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठ्या प्रमाणात आणि चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही योजना महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय ठरली. महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा फायदा देखील महायुतीला झाल्याचं म्हणायला हरकत नाही. महायुतीला मोठ्या मताधिक्यांनी लाडक्या बहिणींनी पसंती दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ असंही सांगितलं होतं. मात्र हे डिसेंबर महिन्यात जमा होणार का की जानेवारी महिन्यात जमा होणार, त्यासाठी कोण लाभार्थी असणार? याची अद्याप कोणतेही डिटेल्स समोर आले नाहीत. सुरुवातीला अर्ज केलेल्या महिलांना मिळणार की सरसकट सगळ्यांना त्याचा लाभ दिला जाणार याबाबतही अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. आचारसंहितेमुळे तूर्तास ही योजना स्थगित करण्यात आली होती. आता लवकरच पुन्हा ही योजना सुरू केली जाणार आहे. ज्यांना या योजनेचा अजून लाभ मिळाला नाही त्यांनी या योजनेचं स्टेटस चेक करावं. तुमचा अर्ज बाद झाला असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now