⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | सोन्याने उधळला दरवाढीचा गुलाल; जळगावात आज प्रति ग्रॅमचा भाव किती?

सोन्याने उधळला दरवाढीचा गुलाल; जळगावात आज प्रति ग्रॅमचा भाव किती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२४ । गेली दोन आठवडे सोने आणि चांदी दरात घसरण झाल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आता पुन्हा आंतरराष्ट्रीय जगतात युद्धजन्य परिस्थितीने सोने दरात वाढ होत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदान (२० नाव्हेंबर) ते मतमोजणी (२३ नाव्हेंबर) या तीनच दिवसात सोने २४०० रुपयांनी महाग झाले.

जळगाव सुवर्णपेठेत मतदान झाल्याच्या दिवशी अर्थात, बुधवारी सोन्याचे प्रतितोळ्याचे दर ७६,५०० होते. गुरुवारी १२०० ने तर शुक्रवारी पुन्हा ९०० रुपयांनी सोने महागले. शनिवारी त्यात आणखी ३०० रुपयांची वाढ नोंदवली गेली. यामुळे आज सकाळी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ७८९००वर पोहोचले आहे.

दुसरीकडे चांदीत कोणताच मोठा बदल दिसला नाही. या तीन दिवसांत चांदीत मोठा उलटफेर झालेला नाही. सध्या एक किलो चांदीचा भाव ९२५०० रुपये इतका आहे. दरम्यान पुढील आठवड्यात सोन्याचा भाव आणखी वाढण्याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.