जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२४ । ऐन दिवाळीत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये ऐतिहासिक वाढ झाल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसली. मात्र आता दिवाळी संपताच सोन्यासह चांदीची झळाळी ही झटपटीने कमी झाली. जळगावच्या सुवर्णपेठेत सोने १ हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात चार हजार रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.
जळगावच्या सराफ बाजारात धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी विनाजीएसटी सोने ८०४०० तर चांदी १ लाख रुपयांवर पोहचली होती. यानंतर दिवाळी दिवशी सोने ४०० रुपयांनी घसरून ८०००० हजारांवर पोहोचले होते. तसेच चांदीचा दरही एक हजाराने घसरून ९९ हजारावर पोहोचले होते. ऐन दिवाळीत सोने दराने उच्चांकी पातळी गाठल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला होता.
जळगावमध्ये मंगळवारी सोने १२०० रुपयांनी घसरून ७९२०० वर तर चांदी ४ हजार रुपयांनी खाली येऊन ९६ हजारांवर आली आहे. १५ दिवसात सोने-चांदी दर पूर्ववत होण्याचा अंदाज जाणकारांचा आहे.