जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२४ । ऐन दिवाळी काळात सोने आणि चांदीचे दर प्रचंड वाढल्याने ग्राहकांना मोठी झळ बसली असून आता दिवाळीचा सण संपल्यानंतर सोन्याच्या भावात घसरण सुरू झाली आहे.
भारतात सोने-चांदीच्या किंमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. देशातील मोठ्या शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव ८०,००० रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
आज सोमवार ४ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात ४०० रुपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव सुमारे ८०,३०० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ७३,६०० रुपयांच्या पातळीवर आहे. तर चांदी ९६,९०० रुपये किलो आहे.
वायदे बाजारात सोन्याची किंमत
सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमतीत आज जबरदस्त घट नोंदवली आहे. दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर सोन्याच्या दराने नुस्ता हाहाकार माजवला होता. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा बेंचमार्क डिसेंबर करार आज ४३३ रुपयांच्या घसरणीसह ७८,५४१ रुपयांवर उघडला. मागील बंद हा ७८,८६७ रुपयांवर झाला. आज सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमत मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबर कराराची किंमत ही ७८,४३४ रुपये आहे.