⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | रावेरमधून नवयुवक प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात; कोण विजयी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष

रावेरमधून नवयुवक प्रथमच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात; कोण विजयी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२४ । राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी तरुणांना संधी देण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील रावेर-यावल मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांना उमेदवारी दिलीय तर दुसरीकडे महायुतीमधील भाजपने अमोल जावळे यांना संधी दिली आहे. नवयुवक आणि प्रथमच विधानसभा निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे रावेरमधून कोण विजयी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे

रावेर हा विधानसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र मागच्या पंचवार्षिकमध्ये या ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली होती. काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी या ठिकाणी विजयी झाले होते. आता शिरीष चौधरी यांच्या मुलाला धनंजय चौधरीला काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. दुसरीकडे माजी खासदार भाजपाचे निष्ठावंत स्व हरिभाऊ जावळे यांच्या मुलाच्या हातात भाजपाने उमेदवारी दिली आहे.

मागच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढणारे अनिल चौधरी यांनी यावेळेस प्रहार संघटनेकडून उमेदवारी घेतलेली आहे. या विधानसभेमध्ये मागच्या पंचवार्षिकमध्ये मोठ्या मतदानाचा टप्पा पार केला होता. आता जनतेचा कल कोणाच्या बाजूने हे बघनं महत्वाचं आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून शमीबा पाटील या मतदारसंघात निवडणूक लढत आहेत. तृतीयपंथी यांना उमेदवारी दिली आहे. रावेर या मतदारसंघात सर्वाधिक पाटील समाजाचे वर्चस्व या ठिकाणी आहे. त्यानंतर आदिवासी आणि मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर आहे.

२०१९ ची आकडेवारी
रावेर : मतदार : २,९७,४०८
झालेले मतदान : २,०१,४५० (६७.७%)
विजयी : शिरीष चौधरी (काँग्रेस) मतेः ७७,९४१ (३८.७ टक्के)
पराभूत: हरिभाऊ जावळे (भाजप) मते ६२, ३३२ (३०.९ टक्के)
पराभूत अनिल चौधरी (अपक्ष)
मते : ४४,८४१ ( २२.३ टक्के)

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.