जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पाच हप्त्याचे पैसे ७५०० हजार रुपये अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. यात राज्य सरकारने निवडणुकीच्या आधीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचेही एकत्रित पैसे महिलांना दिले आहेत. असून परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्यापही लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात आले नाही. पण आता तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्ही देखील पाहू शकता.
माझी लाडकी बहीण योजनेच्या पेमेंटची स्थिती तपासल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्हाला कळेल. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांना त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, CSAC केंद्रात लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म सबमिट करावा लागेल.
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप तुमच्या खात्यात आले नाहीत, तर तुम्ही या योजनेची पेमेंट स्टेट्स तपासणं गरजेचं आहे, त्यानंतर बँकेत जा आणि तुमचा DBT पर्याय सक्रिय करा.
माझी लाडकी बहीण योजनेची स्थिती कशी तपासायची?
महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना स्टे्टस तपासण्यासाठी आणि लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटमेंट तपासण्यासाठी अधिकृत पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलद्वारे, महिला त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात आणि पेमेंटची स्थिती देखील तपासू शकतात.
सर्वप्रथम तुम्हाला testmmmlby.mahaitgov.in पोर्टलवर जावे लागेल.
त्यानंतर लॉगिनसाठी एक पेज उघडेल.
तेथे तुम्हाला Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता तुमच्या समोर Beneficiary Status लाभार्थी स्टेटसचे पेज उघडेल.
येथे तुम्ही तुमचा नोंदणी क्रमांक आणि मोबाइल क्रमांकाद्वारे माझी लाडकी बहीण योजनेची स्थिती तपासता येईल.
तुमच्या मोबाईल नंबरच्या पर्यायावर क्लिक करा आणि कॅप्चा टाका आणि Get OTP वर क्लिक करा.
यानंतर, तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP मिळेल, तो टाका आणि Get Data वर क्लिक करा.
आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल जिथे माझी लाडकी बहीण योजनेची स्थिती दिसेल.
या पृष्ठावर तुम्ही तुमची पेमेंट स्थिती आणि फॉर्मचं स्टेट्स तपासू शकता.