जळगाव लाईव्ह न्यूज । महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील यांचा मतदार संघात प्रभाव दिसून येत असल्याने खडसेंनी त्यांना शह देण्यासाठी चंद्रकांत निंबा पाटील नावाचे इतर मतदार संघातील दाखल केलेले दोघांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहे. तर महायुतीतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यासह एकूण २३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.
महायुतीचा मतदार संघातील प्रभाव आणि शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील यांचं प्राबल्य पाहता , खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार रोहिणी एकनाथ खडसे यांना निवडणूक सोपी व्हावी यासाठी मतांचे ध्रुवीकरण करण्याचे मनसुबे आखलेले आहेत. त्यातील काही अपक्ष उमेदवार दिलेले आहेत तर चंद्रकांत पाटील यांच्या नावातच संभ्रम निर्माण करण्यासाठी देखील मोठी व्यूहरचना आखलेली होती.त्यानुसार त्यांनी खालील प्रमाणे दोघांचे उमेदवारी काल दि.२९ रोजी शेवटच्या क्षणी दाखल केलेली होती.
१) चंद्रकांत निंबा पाटील (वडिलांचे नाव निंबा गणा पाटील) मु. डोंगरगाव पो.वाघाडी बू. ता. शिंदखेडा जि.धुळे
२) चंद्रकांत निंबा पाटील (वडिलांचे नाव निंबा कौतिक पाटील) मु.पो. खडके खु. ता.एरंडोल जि.जळगाव
अशा दोघांची बनावट उमेदवारी दाखल करण्यात आलेली होती परंतु त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करतांना त्यांचे नाव समाविष्ट असलेल्या मतदार यादीची प्रमाणित नक्कल वेळेत छाननीच्या वेळेस सादर न केल्याने दोघांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. रोहिणी खडसेंच्या नावाची उमेदवारी खडसेंना डोकेदुखी ठरणार असून खडसेंनी आखलेली व्युवरचना आता त्यांच्याच अंगाशी येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. तीस वर्षे खडसे खेळत आलेल्या राजकीय डावात स्वतः च फसल्याची चर्चा मतदार संघात होत असून पक्ष बदलाच्या कोलांट उड्या जनतेलाच नव्हे तर ईश्वराला देखील मान्य नसल्याचे देखील बोलले जात आहे.
रोहिणी खडसे नावाच्या दोघं उमेदवारांची अर्ज ठरली वैध
नहले पे दहला खेळ खेळत आ.चंद्रकांत पाटील यांनी देखील खडसे चालत असलेल्या चालीला शह देण्यासाठी रोहिणी खडसे नावाच्या दोघांची अर्ज भरले होते. हे दोघंही अर्ज वैध ठरले आहे. त्यामुळे ३० वर्षांच्या खडसेंच्या अनुभवी राजकीय खेळीना नवख्या राजकीय धुरिणांनी शह दिल्याचे बोलले जात आहे. चंद्रकांत पाटलांनी खडसेंना “धोबी पछाड” दिल्याचे दिसून येत आहे.