गोदावरी सीबीएसई स्कूलमध्ये मुलांसाठी पोक्सो अॅक्टवर कार्यशाळा संपन्न
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२४ । गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये मुलांसाठी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्सेस अॅक्ट (पोक्सो अॅक्ट) वरती एक विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकारांचे ज्ञान देणे, त्यांचे संरक्षण आणि सुरक्षितता याबाबत जागरूकता निर्माण करणे होते. कार्यशाळेसाठी कायदा आणि समाजसेवा क्षेत्रातील तज्ञ ड.रवींद्र सिंग पाटील मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी पोक्सो अॅक्टच्या विविध बाबींचे सखोल मार्गदर्शन केले आणि मुलांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी कायद्याने दिलेले अधिकार समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना अॅक्टचे महत्त्व, त्यांचे हक्क आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले उपाय याबद्दल माहिती देण्यात आली.कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि त्यांचे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
शाळेच्या प्राचार्या नीलिमा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे महत्व पटवून दिले आणि याविषयी सजग राहण्याचा सल्ला दिला.कार्यशाळा विद्यार्थ्यांनी व उपस्थित सर्व शिक्षकांनी अत्यंत साकारात्मक प्रतिसादाने स्वीकारली तसेच त्यांना दिलेली माहिती उपयुक्त असल्याचे सांगितले.शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेसाठी वचनबद्ध असल्याचे सांगितले आणि भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येईल अशा आश्वासन दिले. या कार्यक्रमाला शाळेतील प्राचार्य सौ. निलीमा चौधरी सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.