⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 28, 2024
Home | जळगाव जिल्हा | जोरदार शक्ती प्रदर्शननंतर आमदार राजूमामा भोळे यांनी भरला उमेदवारी अर्ज

जोरदार शक्ती प्रदर्शननंतर आमदार राजूमामा भोळे यांनी भरला उमेदवारी अर्ज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२४ । जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे आमदार सुरेश(राजूमामा) भोळे यांनी आज दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी आपला उमेदवारी अर्ज तहसीलदार कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत विनय गोसावी यांच्याकडे दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गर्दी पाहून मोठ्या मताधिक्क्याने निवडून येईल, असा विश्वास आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केला आहे

जळगाव शहर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांना भाजपने उमेदवारी दिली. गेल्या दहा वर्षात जळगाव शहरात केलेल्या विकास कामांच्या बळावर या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केलेली आहे. नामांकन अर्ज दाखल करताना खा. स्मिता वाघ, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे उपस्थित होते.

यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आ. राजूमामा भोळे म्हणाले की, आम्ही केवळ विकास कामांच्या बळावर जनतेसमोर जाणार आहोत. प्रचारामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्वाखाली सरकारने केलेली विकासाची कामे घेऊन आम्ही जनतेपुढे लेखाजोखा मांडणार आहे. गेल्या दहा वर्षात जळगाव शहरामध्ये केवळ विकास कामांसाठी काम केले. जे विकास कामे आम्ही केले ते जनतेला माहित आहे. ते पाहून जनता आम्हाला नक्कीच मत देईल यात शंका नाही अशीही अपेक्षा आ. राजूमामा भोळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.