जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२४ । जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून सुरेश भोळे हे तिसऱ्यांदा आमदार बनावेत, यासाठी मुस्लिमबांधवांनी रविवार, २७ रोजी दुपारी गरीब नवाज ख्वाजा मिया दर्यावर चादर चढवून प्रार्थना केली. भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक युवा मोर्चाने हा उपक्रम राबविला.
चादर चढविताना मुस्लिम समाज बांधवानी सुरेश भोळे निवडून आल्यानंतर त्यांना दर्गावर आणू, अशीही दर्यावर प्रार्थना केली. तसेच राजूमामा भोळे निवडून आले तर ११ किलो महाप्रसाद वाटप करु असेही जाहीर केले.
याप्रसंगी अल्पसंख्याक युवा मोर्चाचे महानगर अध्यक्ष अशफाक मुनाफ खाटीक, सरचिटणीस मोहसीन शाह, सरचिटणीस जावेद खाटीक, उपाध्यक्ष शाहीद शेख, चिटणीस वसीम कुरेशी, चिटणीस शरीफ बाबा यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.