⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | बाबो..! जळगावात चांदीने गाठला 1 लाखाचा टप्पा, सोनेही 80 हजाराच्या उंबरठ्यावर

बाबो..! जळगावात चांदीने गाठला 1 लाखाचा टप्पा, सोनेही 80 हजाराच्या उंबरठ्यावर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२४ । मागील गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात सुरु असलेली दरवाढ थांबण्याचं नाव घेत नाहीय. जळगाव सुवर्णपेठेत पुन्हा एकदा सोने आणि चांदी दरात वाढ झालीय. यामुळे चांदीने विनाजीएसटी एक लाखाचा टप्पा गाठला आहे. सोबतच सोने दरही ८० हजाराच्या उंबरठयावर पोहोचला आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना सोनं चांदी खरेदी करणे आवाक्याबाहेरच गेलं आहे.

दिवाळी व त्यानंतरच्या लग्नसराईच्या तोंडावर देशातील सराफा बाजारात जोरदार तेजी दिसून येत आहे. बुधवारी जळगाव सराफा बाजारात २४ कॅरेट सोने दरात एकाच दिवशी प्रति १० ग्रॅममागे ८०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आज गुरुवारी सकाळी सोन्याचा दर ७९,५०० वर (जीएसटीसह ८१,८८५ रु.) पोहोचले. गेल्या सहा दिवसांत सोने तब्बल दीड हजार रुपये महागले आहे, तर चांदीने मात्र एका दिवसात १ हजार रुपयांची उसळी घेतली.

यामुळे चांदीने आजवरचा उच्चांकी दर गाठला आहे . प्रथमच चांदीचा दर १ लाख रुपयावर गेला तर जीएसटीसह १,०३,००० रुपयावर पोहोचला. दागदागिन्यांसाठी वापरले जाणारे २२ कॅरेट सोने दरातही जळगाव सराफा बाजारात बुधवारी प्रति १० ग्रॅममागे ७३४ रुपयांची वाढ झाली. मंगळवारी २२ कॅरेट सोन्याचे भाव ७२, १४४ रुपये होता तो बुधवारी ७२,८७८ रु. (जीएसटीसह ७५,०६४ रु.) झाला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (आयबीजेए) देशात या वर्षी सोने भावात २४.४२ टक्के वाढ झाली आहे, तर चांदी सरासरी ३५ टक्के महागली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.