⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | शिवसेना शिंदे गटाची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; जळगाव ग्रामीणमधून मंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा संधी

शिवसेना शिंदे गटाची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; जळगाव ग्रामीणमधून मंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा संधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत जळगाव ग्रामीण मधून पुन्हा एकदा विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना संधी मिळाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन आठवडा उलटा तरी महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नव्हता. तीन चार दिवसापूर्वी भाजपने पहिल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यामुळे महायुती मधील शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून उमेदवारी कधी जाहीर होईल आणि कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता होती. अखेर आज बुधवारी शिंदे गटाकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मंत्री आणि बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदार संघातून मंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळाली. तर एरंडोलमधून विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचे पुत्र अमोल पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तर चोपडामधून चंद्रकांत सोनावणे यांना संधी देण्यात आली. तसेच पाचोरा, मुक्ताईनगरमधून विद्यमान आमदारांना संधी देण्यात आलीय

शिवसेना शिंदे गटाची संपूर्ण यादी
कोपरी पाचपाखाडी – एकनाथ शिंदे

साक्री (अज) – मंजूळाताई गावित

चोपडा (अज) – चंद्रकांत सोनावणे

जळगाव ग्रामिण – गुलाबराव पाटील

एरंडोल – अमोल चिमणराव पाटील

पाचोरा – किशोर पाटील

मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील

जोगेश्वरी (पूर्व) – मनिषा वायकर

चांदिवली – दिलीप लांडे

कुर्ला (अजा) – मंगेश कुडाळकर

माहिम – सदा सरवणकर

भायखळा – यामिनी जाधव

कर्जत – महेंद्र थोरवे

अलिबाग- महेंद्र हरी दळवी

महाड- भरतशेठ मारुती गोगावले

उमरगा- ज्ञानराज धोंडीराम चौगुले

परांडा- डॉ.तानाजी जयवंत सावंत

सांगोला- शहाजी बापू पाटील

कोरेगाव- महेश शिंदे

पाटण- शंभूराज देसाई

दापोली- योगेश कदम

रत्नागिरी- उदय सामंत

राजापुर- किरण सामंत

सावंतवाडी- दीपक केसरकर

राधानगरी- प्रकाश आबिटकर

करवीर- चंद्रदिप नरके

बुलढाणा – संजय गायकवाड

मेहकर (अजा) – डॉ. संजय रायमुलकर

दर्यापूर (अजा) – अभिजित अडसूळ

रामटेक – आशिष जैस्वाल

भंडारा (अजा) – नरेंद्र भोंडेकर

दिग्रस – संजय राठोड

नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर

कळमनुरू – संतोष बांगर

जालना – अर्जून खोतकर

सिल्लोड – अब्दुल सत्तार

खानापुर- सुहास बाबर

छत्रपती संभाजीनगर मध्य – प्रदीप जैस्वाल

छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अजा) – संजय शिरसाट

पैठण – विलास भूमरे

वैजापूर – रमेश बोरनारे

नांदगाव – सुहास कांदे

मालेगाव बाह्य – दादाजी भुसे

ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक

मागाठाणे – प्रकाश सुर्वे

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.