जळगाव जिल्हा

कार्यकर्त्यांनो, प्रचार करताना ही काळजी घ्या, अन्यथा…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून यामुळे आता राज्यात जणू एक उत्सवच सुरू झाला आहे. या काळात कार्यकर्ते अधिक उत्साही असतात. मात्र अति उत्साहात नियम मोडला गेल्यास त्यावर यंत्रणेची नजर राहणार आहे. अनेकदा मतदारसंघ मोठा असल्यामुळे अनेक उमेदवार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयल करत असतात. मात्र, उमेदवाराचा प्रचार करताना कार्यकर्त्यांनाही आचारसंहितेचे पालन करावे लागणार आहे. त्यांच्यावरही काही नियम, निर्बंध घातले आहेत.

इथे ध्वनिक्षेपकास मनाई आहे
पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ध्वनीक्षेपक वापरता येणार नाही.
सकाळी सहा वाजेपूर्वी आणि रात्री १० वाजेनंतर ध्वनीक्षेपक वापरावर बंदी.
ध्वनीक्षेपकासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध.
फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा.
माहिती कळविणे बंधनकारक. ध्वनीक्षेपकाच्या परवानगीची

झेंडे भित्तिपत्रके लावण्यास निर्बंध
खासगी जागेत झेंडे, भित्तिपत्रके लावण्यासाठी मालकाच्या परवानगीची आवश्यकता.
झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी बॅनर, घोषणा लिहिण्यासाठी संबंधित यंत्रणेची परवानगी आवश्यक.
इमारतीचे आवार, भिती यावर पत्रक, जाहिराती लावण्यासाठी जागा मालकाची परवानगी आवश्यक.

प्रचार वाहनांसाठी परवानगी
प्रचार वाहनांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक.
अर्ज, वाहनाचे आरसी बुक सादर करणे वाहनाचा विमा, कर भरणा पावती, पीयुसी, फिटनेस प्रमाणपत्र, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करावे लागेल. वाहनाची चारही बाजूचा फोटो पोलिसांचा नाहरकत दाखला व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button