जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२४ । दिवाळीपूर्वी सोने ८० हजारापुढे तर चांदी १ लाखांवर जाणार असल्याचा अंदाज जाणकारांनी वर्तविला होता. आता तो तंतोतंत खरा ठरला आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या किंमती सुरु असलेली दरवाढ सुरूच आहे. एकीकडे दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना सध्या सोन्यासह चांदीच्या किमतीने आजपर्यंतची सर्वात उच्चांकी मजल मारली आहे. यामुळे दिवाळीत दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे डोळे पांढरे झाले आहे. तुम्हीही खरेदीला जाणार असाल तर जळगाव सुवर्ण बाजारात आज सोने आणि चांदीचे दर काय आहेत ते जाणून घ्या..
जळगाव सुवर्णपेठेत दोन्ही धातूंच्या किमतींत ऐतिहासिक वाढ झालीय. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत प्रति तोळा ७०० रुपये तर चांदीच्या किमतीत तब्बल २००० रुपयाची वाढ झाली. यामुळे चांदीचा दर विनाजीएसटी एक लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. दुसरीकडे सोनेही ८० हजाराच्या जवळ पोहोचले.
काय आहे सोने चांदीचा दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी झालेल्या या दरवाढीने आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ७२, ३२८ रुपये प्रति तोळा इतका आहे. तर २४ कॅरेट सोने ७८,९०० रुपये प्रति तोला तर जीएसटीसह ८१,२६८ रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे.
दरवाढीने कारण काय ?
एकीकडे इराण-इस्रायलमधील युद्ध आणि दुसरीकडे बॅंकांकडून सोने खरेदी केली जात असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर वाढले आहेत. ही दरवाढ दिवाळीमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांवर परिणाम झाला.सध्या वाढत्या किमतींनी दिवाळीत सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.