मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवून शेकडो नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

ऑक्टोबर 20, 2024 1:49 PM

जळगांव ग्रामीणमध्ये शिवसेनेची ताकद वाढली

Hundreds of citizens join Shiv Sena

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२४ । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहे. यातच जळगांव ग्रामीण मतदार संघामधील शेकडो जणांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे जळगांव ग्रामीणमध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे.

New Project 2 1

पाळधी येथे मतदार संघातील विविध विकास कामाने प्रभावित होऊन व ना. गुलाबराव पाटील यांच्यावर वर विश्वास ठेवत शिरसोली, ममुराबद, भोने,अहिरे बिलवाडी,लमांजन, गारखेडा,चावळखेडा,सुभाषवाडी कुऱ्हाळदा,भागपूर ,लोणवाडी येथील शेकडो नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश करीत मंत्री गुलाबराव पाटील यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी करण्याचा संकल्प केला.

JL

तसेच पालधी येथील संपूर्ण मुस्लिम पंच कमिटी यांनी विधानसभेत संपूर्ण सहकार्य करण्याचे वचन दिले. यावेळेस मा सभापती कैलास चौधरी, मुकुंदराव नंनवरे संजय पाटील सर ,तालुका प्रमुख डी ओ पाटील,दीपक भदाणे, जी प सदस्य गोपाळ बापू पाटील, शाम कोगटा, मनोज चौधरी,रोहित कोगटा, महानगर प्रमुख संतोष पाटील, ओबीसी अध्यक्षय राजेंद्र पाटील, पिंटू भाऊ,नंदू आबा पाटील, बबन भाऊ, धोंडू भाऊ जगताप बंडू पाटील,भैया मराठे सर, सरपंच विजू बापू पाटील दोन गाव चे सरपंच भागवत शेठ, पवन पाटील,कैलास सोनवणे किशोर निकम,शुभम पाटील गोरख पाटील ,यांच्या सह मतदारसंघातील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now