जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र सरकार मार्फत देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात असून त्यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी.
या अंतर्गत नागरिकांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात.त्यानंतर आता सरकारने शेतकऱ्यांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. सरकारच्या पीएम किसान एफपीओ योजनेअंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी १५ लाखांची मदत केली जाते.
भारत सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीएम किसान एफपीओ योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार ११ शेतकऱ्यांच्या गटाला शेतीशीसंबंधित स्टार्टअप सुरु करण्यासाठी मदत केली जाते. पीएम किसान फार्मर प्रोड्यूसर ऑर्गनायझेशन असं या योजनेचं नाव आहे. या योजनेत स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी १५ लाखांची मदत केली जाते.
या योजनेअंतर्गत सरकार फार्मर प्रोड्यूसर ऑर्गनायझेशनच्या मदतीने शेतीसंबंधित व्यवसायांना मदत करते. या योजनेअंतर्गत जर कोणत्याही एका शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. तर ११ शेतकऱ्यांच्या गटाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतो. या योजनेअंतर्गत https://www.enam.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतो. त्यानंतर होमपेजवर रजिस्ट्रेशन करुन लॉग इन करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती द्यावी लागणार आहे आणि फॉर्म सबमिट करावी लागेल.