मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. तुमचे विरोधक सक्रिय राहतील. आवश्यकतेनुसार कामात पूर्ण लक्ष द्यावे लागेल. एखाद्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करू नका. तुमचं आरोग्य चांगलं राहील. कमीत कमी वेळात कामं आटोपून घेण्याचा प्रयत्न करा. नोकरदारांना अधिकाऱ्यांकडून मदत होणार आहे. रिअल इस्टेटचं काम करणारे आज नव्या हाऊसिंग प्रकल्पाचं लॉन्चिंग करतील.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. तुमचे काम तुमच्या बुद्धीने पूर्ण होईल. कुटुंबातील सदस्यांशी काही कारणावरून वाद होऊ शकतात. तुमच्या तब्येतीत काही चढ-उतार.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह कुठेतरी बाहेर जाऊ शकता. आज एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिशी भेट होईल. त्याचा तुम्हाला भावी आयुष्यात मोठा फायदा होणार आहे. एखाद्या खास कामात फायदा होणार आहे. गावाला जाण्याचा योग आहे. पण दूरचा प्रवास टाळा
कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कायदेशीर बाबींमध्ये चांगला राहील. लांबच्या प्रवासाला जाण्याची संधी मिळेल. आज तुमच्या जीवनसाथीला प्रगती करण्याची संधी मिळणार आहे. कुरिअरचा व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला फायदा होणार आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समस्यांपासून मुक्ती मिळवणारा आहे. तुमच्या मुलाला एखाद्या गोष्टीचा राग येईल. या राशीचे जे लोक पेंटिंग्जचे काम करतात, त्यांची पेंटिग्ज आज प्रदर्शनात लावली जाण्याची शक्यता आहे.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समस्यांनी भरलेला असेल. जर तुम्हाला कोणत्याही तणावाचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला त्यातून आराम मिळेल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्याचा असेल. व्यवसायात तुमच्या इच्छेनुसार नफा मिळेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज विचारपूर्वक काम करा. तुमच्या प्रगतीच्या आड येईल. तुमच्या आईवडिलांची तुमच्यावरील नाराजी दूर होईल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस त्यांच्या बाजूचा राहील.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा राहील. तुमची लोकांशी चांगली मैत्री होईल आणि तुमच्या घरी काही शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.
मकर
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीने भरलेला असेल. तुम्हाला कोणत्याही समस्येपासून दूर राहावे लागेल. तुम्हाला चांगलं आरोग्य हवं असेल तर आतापासूनच डाएट सुरू करा. तुमच्या वागण्या बोलण्यात बदल होईल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने कमकुवत असणार आहे. तुमच्या काही जुन्या समस्या पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.
मीन
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला राहील, जे काही काम कराल त्यात यश मिळण्याची शक्यता आहे.