म्हसावद भागात १९ गावांना अखंडित विजेसाठी दिलासा,शिरसोली १३२ के.व्ही. चे उपकेंद्र मंजुरीच्या अंतिम टप्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२४ । म्हसावद ते नागदुली ३३ के. व्हीं. लिंक लाईनचे काम २ महिन्यात पूर्ण होणार असून यामुळे म्हसावद व परिसरातील उन्हाळ्यातील विजेचा लपंडाव कायमस्वरूपी बंद होणार आहे. तसेच सुमारे ८० कोटीच्या शिरसोली १३२ के. व्हीं उपकेंद्र मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असून या उपकेंद्रामुळे जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण भागातील प्रमुख उपकेंद्रांना सुरळीत दाबाने वीज पुरवठा होणार आहे. उद्योगधंदे यांच्या विद्युतीकरणाचा प्रश्न या शिरसोली उपकेंद्रामुळे सुटणार असून ३४ कोटी ५२ लक्ष निधीतून म्हसावद व परिसरातील रुग्णांना आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी यासाठी सर्व सुविधायुक्त ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाच्या मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
सुरुवातीला जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील ३३/११ के. व्हीं उपकेंद्र येथे जिल्हा नियोजन व विकास समिती (डी.पी.डी.सी) अंतर्गत मंजूर ३३ के.व्ही. नागदूली ते म्हसावद ह्या उच्चदाब वाहिनीचे कामाचे भूमिपूजन आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते म्हसावद येथील वीज उपकेंद्रात करण्यात आले. या प्रसंगी अजय भोई यांची एस. आर. पी. कॉन्स्टेबल पदी नियुक्ती झाल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
१९ गावांना मिळणार दिलासा
म्हसावद उपकेंद्र अंतर्गत म्हसावद व वावडदा परिसरातील १९ गावातील सर्व घरगुती व शेतीपंप ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाचा विद्युत पुरवठा मिळणार असून सदर कामाचा फायदा म्हसावद, बोरनार, लमांजन , वाकडी, कुऱ्हाडदे, डोमगाव, पाथरी ,वडली, वावडदा, रामदेववाडी व इतर गाव तसेच तांड्यांना फायदा होईल. सदर उच्च दाब वाहिनी अंदाजे ५ किमी असून १ कोटी २५ लक्ष रुपये निधी मंजूर झालेला आहे सदर काम ३ महिन्याच्या आत पूर्ण होईल असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता जयंत चोपडे यांनी नागदेवी ते म्हसावद येथे डीपीडीसी अंतर्ग तमंजूर असलेल्या 33 केव्ही लिंक लाईन बाबत सविस्तर माहिती विशद केली. सूत्रसंचालन माजी उपसरपंच शितलताई चिंचोरे यांनी केले तर आभार उपअभियंता विजय कपुरे यांनी मानले.