⁠ 
[rank_math_breadcrumb]

परतीच्या पावसानं जळगावला झोडपलं! शेतीपिकांचं नुकसान, पावसाचा कहर कधी थांबणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२४ । मान्सूनने परतीची वाटचाल सुरु केल्यानंतर गेल्या ४ दिवसांपासून जळगावसह राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान होत असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आता परतीच्या पावसाचा कहर नेमका कधी थांबणार? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली आहे.

काय आहेत पावसाचा अंदाज?
हवामान खात्यानं आज शनिवारपासून राज्यात सुरु असलेल्या पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ढगांच्या गडगडाटासह, मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.

आज (ता. २८) उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह नंदुरबार, धुळे, आणि इतर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर जिल्ह्यांला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, मागील तीन चार दिवसापासून जळगाव जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपून काढलं आहे. शुक्रवारी सायंकाळी जळगाव शहरासह परिसरात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला.अवघ्या २५ मिनिटात ४२ मिलीमीटर पाऊस झाला. यामुळे रस्ते जलमय झाले होते. दरम्यान पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झाले असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीच्या पावसाचा कहर नेमका कधी थांबणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यातच उद्या म्हणजेच रविवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत जळगावसह खान्देशात ढगाळ वातावरण राहून हळूहळू पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. केवळ अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असू शकते. सहा ऑक्टोबरनंतर पुन्हा पावसाची सक्रियता वाढून १३ ऑक्टोबरर्यंत म्हणजे आठवडाभर खान्देशासह महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे १६ ऑक्टोबरनंतर मान्सून थांबेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.