जळगावातील शालीमार हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२४ । गेल्या तीन दिवसापूर्वी जळगाव शहरात पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. मयूर उर्फ यशवंत राजेंद्र सोनार (रा. दिनकर नगर), सचिन राजेंद्र जगताप (रा. शाहूनगर) व गोकुळ सुरेश कोळी (रा. साळवा नांदेड, ता. धरणगाव) असे अटक केलेल्या तिघांचे नाव असून तो कट्टा गोट्या उर्फ गोकुळ सैंदाणे याने आणल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
नेमकी घटना काय?
जळगाव शहरातील भास्कर मार्केटसमोरील हॉटेल शालीमारमध्ये हद्दपारीची कारवाई झालेला भूषण सपकाळे व मयुर सोनार यांच्यासह सात ते आठ जण दारु पिण्यासाठी आले. दारु पित असतांना अचानक त्या टोळक्यातील एकाने त्याच्याजवळील पिस्तुल काढून जमीनिवर गोळीबार केला. मोठा आवाज झाल्याने हॉटेलमध्ये पळापळ झाली. यावेळी भूषण सपकाळे हा जोरजोरात ओरडून मला भूषण सपकाळे म्हणतात, मी राऊंड फायर केला असे कुणाला सांगितले तर मर्डर करुन टाकेल अशी धमकी दिली. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्यांनी हॉटेलचे बील भरुन तेथून पळ काढला होता. याप्रकरणी रात्री उशिरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोळीबाराची घटना उघडकीस आल्यानंतर एलसीबीच्या पथकाने तपाचक्रे फिरवित गोळीबार करणारा हद्दपारीची कारवाई झालेला भूषण सपकाळे याला रात्री अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित या तिघांच्या मुसक्या आवळल्या.