जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२४ । धरणगाव तालुक्यातील बिलखेडे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी भेट दिली. यावेळी गावातील 30 ते 32 घरांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी नागरिकांनी समस्या मांडताच त्यांनी ‘ऑन द स्पॉट’ सोडविल्या.
प्रत्येक घरोघरी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रतापराव पाटील बिलखेडे गावात आले असता त्यांनी प्रत्येक घरोघरी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तर यातील काही समस्या प्रतापराव पाटील यांनी ‘ऑन द स्पॉट’ सोडविल्या.
शेतकऱ्यांची समस्याचे निराकरण !
गावात विद्युत रोहित्र गेल्या दीड वर्षांपासून मंजूर करण्यात आला होता. मात्र, विद्युत रोहित्र बसविण्यासाठी हलगर्जीपणा केला जात होता. यामुळे गावातील नागरिकांसह शेतकऱ्यांना शेतात काम करताना अडचण येत होत्या. ही समस्या प्रतापराव पाटील यांच्याकडे मांडण्यात आली. त्यांनी याची तात्काळ दखल घेऊन लागलीच ‘ऑन द स्पॉट’ महावितरणाला फोन केला. आणि शेतकऱ्यांची समस्याचे निराकरण झाले.
बसची समस्या सोडवली !
बिलखेडे गावात रघुवीर समर्थांची मंगळवारी बैठक असते. या बैठकीसाठी विविध ठिकाणाहून महिला बसने येत असतात. पण, ही बस महिलांना सोडून तर द्यायची पण परत नेण्यासाठी येत नव्हती. ही समस्या रघुवीर बैठकीतील विद्याबाई पाटील, भारतीबाई भदाणे, शोभाबाई पाटील, प्रमिलाबाई पाटील, कल्पनाबाई पाटील, मालुबाई भदाणे, विजयाबाई शिंदे, संगीता भदाणे, सुवर्णा पाटील, छाया राजपूत (लोणे), जागृती पाटील (लोणे), अलका पाटील (लोणे), कीर्ती पाटील (लोणे), प्रतिभा पाटील (लोणे), सरला पाटील (लोणे), सोनी पाटील (लोणे), मालुबाई पाटील (लोणे), चैताली पाटील (लोणे) या महिलांनी प्रतापराव पाटील यांच्याकडे मांडली. लागलीच प्रतापराव पाटील यांनी एसटी महामंडळाच्या प्रमुखांशी बोलणे करून महिलांच्या समस्येचे निराकरण केले. या समस्येचे निराकरण झाल्याने महिला आनंदी झाल्या.
महिलेने मानले प्रतापराव पाटील यांचे आभार !
गावातील सुशिलाबाई भदाणे या महिलेच्या डोळ्याचे जीपीएस परिवारातर्फे ऑपरेशन करण्यात आले होते. यासाठी सुशिलाबाई भदाणे यांनी प्रतापराव पाटील यांचे आभार मानले. तसेच गावातील एका जणांचा आर्थिक समस्येचा विषय होता तो देखील प्रतापराव पाटील यांनी मार्गी लावला.