⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | नोकरी संधी | 10वी ते B.Tech, BE पाससाठी सरकारी नोकरीची संधी! 1.77 लाखांपर्यंत पगार मिळेल

10वी ते B.Tech, BE पाससाठी सरकारी नोकरीची संधी! 1.77 लाखांपर्यंत पगार मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणामध्ये अनेक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 18000 ते 1.77 लाख रुपये पगार मिळेल. जर तुम्हाला या भरतींचे संपूर्ण तपशील देखील तपासायचे असतील तर तुम्ही IWAI वेबसाइट cdn.digialm.com वर संपूर्ण तपशील तपासू शकता. लक्षात ठेवा अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबरपर्यंतच आहे.

कोणत्या पदांवर नोकरी?
1) असिस्टंट डायरेक्टर 02
2) असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्व्हेअर (AHS) 01
3) परवाना इंजिन ड्रायव्हर 01
4) ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर 05
5) ड्रेज कंट्रोल ऑपरेटर 05
6) स्टोअर कीपर 01
7) मास्टर 2nd क्लास 03
8) स्टाफ कार ड्रायव्हर 03
9) मास्टर 3rd क्लास 01
10) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 11
11) टेक्निकल असिस्टंट (Civil/ Mechanical/ Marine Engineering/Naval Architect) 04

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी (Civil / Mechanical)
पद क्र.2: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंजिन ड्रायव्हर परवाना
पद क्र.4: B.Com + 03 वर्षे अनुभव किंवा B.Com+Inter ICWA/Inter CA.
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण +10 वर्षांसह अनुभवसह प्रथम श्रेणी चालक म्हणून योग्यतेचे प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा +01 वर्षे अनुभव (ii) पोहण्याचे ज्ञान.
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) मास्टर 2nd क्लास प्रमाणपत्र (ii) पोहण्याचे ज्ञान.
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) मास्टर 3rd क्लास प्रमाणपत्र (ii) पोहण्याचे ज्ञान.
पद क्र.10: 10वी उत्तीर्ण
पद क्र.11: पदवी (Civil / Mechanical/ Marine Engineering /Naval Architecture) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil / Mechanical / Marine Engineering / Naval Architecture)+ 03 वर्षे अनुभव

निवड कशी होईल?
या पदांवरील निवडीसाठी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या परीक्षा होतील. सीबीटी पद्धतीने परीक्षा होईल, याशिवाय मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.

वयाची अट: 15 सप्टेंबर 2024 रोजी, 18 ते 35 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : General/OBC: ₹500/- [SC/ST/EWS/PWD:₹200/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2024 (11:59 PM)
रतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.