जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबवली जाणार आहे. यामध्ये इच्छुक तरूणांना सहा महिन्यासाठी कार्य प्रशिक्षणाची (अॅप्रेंटिंस) संधी मिळणार असून विद्यापीठाच्या विविध विभागात २९ पदांसाठी ३१ ऑगस्ट रोजी थेट मुलाखती होणार आहेत. या योजनेत सहा महिने कार्यप्रशिक्षणाचा कालावधी राहणार असून या कालावधीतील विद्यावेतन शासनामार्फत उमेदवारांना मिळेल.
रिक्त पदांचा तपशील
वित्त व लेखा
कायदा विभाग
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
वायरमन
वातानुकुलीत ऑपरेटर
देखभाल सहाय्यक
क्रीडा प्रशिक्षक
ज्ञानस्रोत केंद्र
Multi Task Operator
सदर योजनेकरिता उमेदवाराची पात्रता खालील प्रमाणे असेलः
१. उमेदवाराचे वय किमान १८ व कमाल ३५ वर्षे असावे.
२. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास/आयटीआय/पदवीधर/पदव्युत्तर किंवा डिप्लोमा धारक असावी.
३. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
४. उमेदवाराची आधार नोंदणी असावी.
५. उमेदवाराचे बैंक खाते आधार संलग्न असावे.
६. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता आणि नाविन्यता विभागाच्या वेबसाइटवर नोंदणी केली पाहिजे.
प्रतिमाह वेतन :
१२ वी पास-६०००/-
आयटीआय/पदविका – ८०००/-
पदवीधर- पदव्युत्तर- १०,०००/-
महास्वयंवर करा नोंदणी:
www.rojgar.mahaswaya m.gov.in या संकेतस्थळावर इच्छुकांनी नाव नोंदणी करावी विहित नमुन्यातील अर्ज विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्हताधारक उमेदवारांनी आवश्यक त्या दस्ताऐवजाच्या मूळ, स्वसाक्षांकित प्रतीसह संलग्न केलेला मूळ अर्जासह विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमधील व्यवस्थापन परिषद सभागृहात १ ऑगस्ट रोजी ११ वाजता उपस्थित रहावे असे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी कळवले आहे.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा