जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर आहे. जळगाव जिल्हा होमगार्ड भरतीची अधिसूचना जारी झाली आहे. पात्र उमेदवारांनी वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनं करावं लागेल. अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच २५ जुलै पासून सुरु होईल. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
पदाचे नाव : होमगार्ड
कोण अर्ज करू शकतो?
होमगार्ड पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 50 वर्षे असावे. (दि. 31/07/1974 नंतर ते दि. 31/07/2004 पुर्वी)
भरतीसाठी शारिरीक पात्राता :
उंची – पुरुष उमेदवारासाठी उंची 162 से.मी. व महिला उमेदवारासाठी 150 से.मी.
छाती – (फक्त पुरुष उमेदवारांकरीता) (न फुगविता किमा. 76 से.मी. कमीत कमी 5 सेमी फुगविणे आवश्यक) अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाही.
आवश्यक कागदपत्र –
1)रहीवासाचा पुरावा मतदान ओळखपत्र, आधारकार्ड.
2) शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र.
3) जन्म् दिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला.
4) तांत्रिक अहर्ता धारण करीत असल्यास तत्सम् प्रमाणपत्र.
5) खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
6) 3 महिन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र.
होमगार्डना देय भत्ते :
होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. 570/- कर्तव्य भत्ता व रु. 100/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. 35/- खिसाभत्ता व रु. 100/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. 90/- कवायत भत्ता दिला जातो.
नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सूचना :
होमगार्ड नोंदणी अर्ज दि. 25/07/2024 ते 14/08/2024 या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरतांना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्रमाक च्या रहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेल्या सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिटकवावा. मराठी मधील नाव उमदवारानी स्वतः पेनाने लिहावयाचे अहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरु नये.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा