जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२४ । मोदी सरकारचा 3.0 चा पहिलाच सर्वसाधारण अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मंगळवारी 2024-25 संसदेत मांडत आहेत. आज सकाळी ११ वाजता या अर्थसंकल्पाला सुरुवात झाली यामध्ये कोण-कोणत्या मोठ्या घोषणा होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारच्या एका महत्वपूर्ण योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ दिल्याची घोषणा केलीय. “प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ दिली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सध्या कठीण काळ. भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास होत राहील” रोजगार वाढवणं लक्ष्य असल्याच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.
कोरोना काळात केंद्र सरकारने देशातील जवळपास 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) सुरु केली होती. या योजनेला सरकारने आता पाच वर्षाची मुदतवाढ दिली आहे. आता ही योजना डिसेंबर 2028 पर्यंत चालणार आहे.यापूर्वी ही योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली होती.