पुढचे दोन दिवस खानदेश सर्वाधिक पावसाचा अंदाज; पुणे वेधशाळेचा अंदाज
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२४ । राज्यात जून महिन्यात काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस जुलै महिन्यात सक्रीय झाला असून राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस बसरणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. पुढचे दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्ती केली आहे.
राज्यातील काही भागांत ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि नांदेड मध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. मात्र अद्यापही मुसळधार पाऊस झाला नाहीय. अशातच जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जुलै उजाडला तरी जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये अवाक वाढलेली नसून यामुळे आता जळगावकर मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यातच आगामी दोन तीन दिवसात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.