⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

‘मविआ’मध्ये जळगावसह कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला ; उमेदवार कोण?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 5 मार्च 2024 । देशासह महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून या निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. यातच राज्यातील महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला दिसत नाहीय. अशातच महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातील महत्वाची अपडेट समोर आली आहे.

महाविकास आघाडीमध्ये जळगाव आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली आहे. महाविकास आघाडीमध्ये हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्षाला सोडणार असून त्याऐवजी शिवसेना ठाकरे गट सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत होत आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर श्रीमंत शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत.शाहू महाराज हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात. तर सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे संभाव्य उमेदवार असतील.

दरम्यान, महाविकास आघाडीची रामटेक आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघ कोणता पक्ष लढवणार यावर अजूनही चर्चा सुरू असून महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सर्व 48 जागांवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.